हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टीतील प्रतिक्रियाही बोलक्या व वास्तवादी असतात. आता तिने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असल्याने ती चर्चेत आली आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403
आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमांगीने तिच्या फेसबुक पेजवर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामधून हेमांगीने म्हंटले आहे की, “मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब! असे म्हंटले आहे. आणि त्याखाली जयभीम, डॉ. बाबासाहेबआंबेडकर, महामानव असे हॅश टॅग दिले आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5568899009796349
या पुर्वीही हेमांगीने सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी हेमांगीने फेसबुक पोस्टमध्ये पेट्रोल विषयी आपले मत मांडले होते. तिने “ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” असे म्हंटले होते.
आता हेमांगी कवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंटही केल्या आहेत. हेमांगी हि आता एका न्या चित्रपटाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. तो चित्रपट हा ‘भारत माझा देश आहे’ हा असून सध्या या चित्रपटाचीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.