हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देण्यासाठी आज हेमंत पाटील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भेट यांची घेणार आहेत. त्यामुळे आज राजकिय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू असताना देखील सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. त्यामुळे शिंदे सरकार त्यांच्याच गटातील नेते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, अद्याप सरकार आरक्षणाबाबत तोडगा निघू शकले नसल्यामुळे कालच खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी, अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा देत असल्याचे कळविले आहे.
या सर्व घडामोडीनंतर आज हेमंत पाटील हे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपला आधिकृत राजीनामा ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, आजच्या भेटीत हेमंत पाटील हे लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळणे किती गरजेचे आहे हा मुद्दा त्यांच्यापुढे मांडतील. दरम्यान हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर याचा सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसणार आहे.