हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. आज 350 वर्षांनंतरही शिवराय जनतेच्या मनामनात आहेत. देशातील आत्तापर्यतचा सर्वात न्यायी, जनतेची काळजी घेणारा आणि दानशूर राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा असेही म्हंटल जाते.
शिवाजी महाराजांचे आपल्या जनतेवर खूप प्रेम होत. शिवरायांनी कधीही जातीधर्मामध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करत स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा आपल्या मावळ्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाकडे विशेष लक्ष्य दिले. आणि जो महिलांचा सन्मान करणार नाही त्याला कठोर शिक्षा सुद्धा दिली.
शत्रू कितीही मजबूत आणि तगडा असला तरी शिवाजी महाराजांना त्याचे भय नव्हते. अत्यंत चतुराईने त्यांनी मुघलांवर मत केली होती. एखादा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांची रणनीती चोख असायची. शत्रूबाबत व्यवस्थित माहिती गोळा करणे, प्रत्येकाला त्याची जबाबदारी देणे आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून मोहीम फत्ते करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता.
शिवरायांकडे मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी बांधलेले किल्ले याचे उत्तम उदाहरण आहे. आजकाल एखादा साधा रस्ता सुद्धा काही वर्षात खचतो. परंतु त्याकाळी शिवाजी महाराजांनी बांधलेलं गडकिल्ले आजही मजबूत असून महाराष्ट्राच्या वैभवाचा भाग आहेत. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. गनिमी कावा हे शिवरायांचे मुख्य अस्त्र म्हणता येईल. त्यांनी लढाया आणि मोहिमा गनिमी कावा करून जिंकल्या आणि शत्रूला जेरीस आणलं. मुघल कितीही शक्तिशाली असले तरी त्यांनी फक्त आपली कल्पकतेने काही मावळ्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला.
शिवाजी महाराज हे न्यायी राजे होते. त्यांनी नेहमी गरिबांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे. स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना महाराजांनी कठोर शिक्षेची तरतूद केली होती. अशा या महाराष्ट्राच्या दैवताला आमचे कोटी कोटी प्रणाम…