नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हा बऱ्याच काळापासून सर्वात पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय मानला जात आहे. साधारणपणे, लोकं घर बांधणे, कार खरेदी करणे, लग्न आणि उच्च शिक्षण यासारखी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करतात. याशिवाय रिटायरमेंटनंतरच्या खर्चासाठी FD मध्ये गुंतवणूक करणेही चांगले मानले जाते. मात्र, FD खाते उघडण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आपली आर्थिक उद्दिष्टे सहज साध्य करता येतील.
किती कालावधीसाठी FD करावी लागेल ?
FD मिळवण्यापूर्वी, तुम्हाला कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी तुमची FD बंद केली तर काही रक्कम दंडाच्या स्वरूपात भरावी लागेल. यासोबतच तुम्हाला FD वर मिळणारा नफाही कमी होतो. त्यामुळे पहिले तुम्ही तुमच्या FD चे पैसे किती काळ सोडू शकता ते ठरवा.
FD टर्म कालावधी
तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD करू शकता. जर तुमच्याकडे आता गरजेपेक्षा जास्त पैसे असतील आणि तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्हाला 5 किंवा 10 वर्षांनी या पैशांची गरज असेल, तर तुम्ही त्याच वेळेसाठी FD मिळवू शकता. साहजिकच, 10 वर्षांच्या FD वरील रिटर्न हे एक वर्षाच्या FD पेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD चा कालावधी निवडू शकता.
FD वर मिळणाऱ्या व्याजावर एक नजर टाका
रिटर्न मिळवण्यात हा सर्वात मोठा घटक आहे, ज्यावर प्रत्येकजण लक्ष ठेवतो. RBI वेळोवेळी व्याजदर बदलत असते. तसेच, FD चे व्याजदर देखील वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे असतात. एवढेच नाही तर FD वर सर्व बँकांचे व्याजदर देखील वेगवेगळे असू शकतात. अशा परिस्थितीत, FD करताना, तुम्हाला विशेषतः हे लक्षात ठेवावे लागेल की, कोणत्या बँकेतून आणि किती काळासाठी FD वर जास्त फायदा मिळेल.
कर्जाची सुविधा आहे की नाही
जरी FD असलेली बहुतेक लोकं त्यावर कर्ज घेण्याचा विचार करत नाहीत, मात्र जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा इतर पर्यायांपेक्षा त्यावर कर्ज घेणे सोपे आणि फायदेशीर होईल. या अंतर्गत, FD च्या एकूण रकमेच्या 75% पर्यंत कर्ज घेता येते आणि FD च्या व्याजदरापेक्षा 2% जास्त दराने त्यावर व्याज द्यावे लागेल. या कर्जाची मुदत FD च्या कालावधीइतकीच आहे. त्यामुळे, जर तुम्ही 10 वर्षांची FD घेतली आणि दुसऱ्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला, तर तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षे असतील.