UPI Fraud पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या काळात ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन खूपच वाढले आहे. याद्वारे अगदी कमी वेळेतच पेमेंटही केले जाते. आजकाल UPI ऑनलाइन पेमेंट करण्यासाठीचे एक चांगले माध्यम बनले आहे. मात्र याद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत.

UPI मध्येही आजकाल अनेक फ्रॉड होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस यामधील फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र सायबर एक्‍सपर्टसचे असे म्हणणे आहे आहे की, जरा थोडी सावधगिरी बाळगली तरी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचता येईल. अशा प्रकारचे गुन्हे करणारी लोकं युझर्सना अनेक प्रकारच्या स्कीम्सचे गाजर दाखवतात. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडून सामान्य लोकं आपलीच फसवणूक करून घेतात. त्यामुळे UPI चा वापर सावधगिरीनेच केलेला बरा…

सायबर एक्‍सपर्टस म्हणतात की, कोणत्याही अनोळख्या व्यक्तीशी आपला UPI PIN कधीही शेअर करू नका. कोणतीही बँक, सरकारी संस्था, ऑफिस, कंपनी किंवा कर्मचारी कॉल तसेच मेसेज करून आपल्याकडे UPI PIN कधीही मागत नाही. त्यामुळे जर कोणी सरकारी कर्मचारी असल्याची बतावणी करून आपल्याकडे UPI PIN ची मागणी करत असेल तर सावध व्हा !

जर तुम्ही स्मार्ट फोन वापरत असाल तर आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही App इन्स्टॉल करण्यापूर्वी ते व्हेरिफाइड असल्याची खात्री करा. कोणत्याही अनोळखी वेबसाईट किंवा लिंक वरून कोणतेही App डाउनलोड करू नका. कोणतेही App डाउनलोड करायचे असेल ते अधिकृत साईट्स वरूनच करा.

बहुतेक UPI Apps मध्ये स्पॅम फिल्टर असतो जो असे UPI ID ट्रॅक करतो ज्याद्वारे वारंवार पेमेंट रिक्‍वेस्‍ट येते. जर तुम्हांलाही अशाच प्रकारची एखादी रिक्‍वेस्‍ट आली असेल तर तुमचा स्पॅम फिल्टर त्याबाबत तुम्हांला अलर्ट करेल. त्यामुळे Apps द्वारे आलेल्या कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्हांला खात्री वाटेल कि रिक्‍वेस्‍ट पाठवणारा योग्य व्यक्ती आहे तेव्हाच ट्रान्सझॅक्शन करा. नाहीतर तुम्ही Decline करू शकाल.

कोणतेही ट्रान्सझॅक्शन जे तुम्हांला रिवॉर्ड, कॅशबॅक किंवा पैसे देण्याचे लालूच दाखवत असेल तर त्यापासून दूर राहा. कारण असे ट्रान्सझॅक्शन तुमचा UPI मिळाल्यावर तुम्हांला काही पैसे जरूर परत करतील मात्र त्याबदल्यात खाते रिकामे केले जाऊ शकेल.

आपल्या खात्याला आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आपला UPI PIN सतत बदलत राहा. दर महिन्याला तसे करावे आणि जर ते शक्य नसेल तर तीन महिन्यातुन एकदा तो जरूर बदलावा. कारण खूप दिवस एकच PIN वापरल्याने तो फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता असते.

कोणतेही अनोळखी लिंक्स आणि SMS वर कधीही उघडू नका. याद्वारे देखील आपले खाते रिकामे होऊ शकेल. फसवणूक करणारे तुम्हांला ऑनलाईन लॉटरी, गेम्सच्या नावाखाली काही लिंक्स पाठवतील. लिंक्स वर क्लिक करताच तुमची माहिती विचारली जाईल. याद्वारे माहिती घेऊन तुमचे खाते देखील रिकामे होऊ शकेल.

Leave a Comment