व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ लोकांना मिळणार नाहीत E-Shram Card चे फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. E-Shram Card ही त्यापैकीच एक आहे. यामागील उद्धेश तळागाळातील कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करणे हा आहे. या सुविधेअंतर्गत कामगारांना 2 लाख रुपयांचे फ्री ऍक्सिडेंटल कव्हर, मासिक भत्ता याबरोबरच इतर फायदे देखील मिळतात.

मात्र जर तुम्ही देखील E-Shram Card बनवले असेल तर त्यामध्ये ही एक चूक केली असेल तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. तसेच कार्डही कॅन्सल केले जाईल. E-Shram Card साठी अर्ज करताना योग्य आणि खरी माहिती भरा. कोणतीही माहिती लपवू नका अन्यथा कार्ड रद्द केले जाऊ शकेल. सर्व माहिती भरण्यापूर्वी फॉर्म पुन्हा एकदा व्यवस्थितपणे चेक करा.

E-Shram Card बनवण्यासाठी बँक खाते असणे आणि त्याचे KYC करणे जरुरीचे आहे. यासाठी आपल्याला बँकेच्या शाखेत जावे लागेल जिथे KYC केले जाईल. यासाठी आपल्याला पण कार्ड आणि आधार कार्डची फोटोकॉपी बँकेत द्यावी लागेल. तसेच आपला मोबाइल नबंरही लिंक करावा लागेल. जेणेकरून या खात्यात सरकारद्वारे दिले जाणारे पैसे व्यवस्थितरीत्या ट्रान्सफर होऊ शकतील. जर KYC केले गेले नाही तर खात्यात पैसे येणार नाहीत.

आतापर्यंत 10 कोटी कामगारांनी E-Shram Card बनवले आहे. यासाठी पात्र ठरलेल्या कामगारांना पहिला हफ्ता देखील बँकेच्या खटल्यात ट्रान्सफर केला गेला आहे. मात्र ज्यांनी योग्य माहिती दिलेली नाही त्यांना दुसरा हफ्ता मिळू शकणार नाही.