भारतामध्ये येथे आहेत ऐतिहासिक आणि प्राचीन राजवाडे!!जेथे तुम्हाला नक्की भेट देऊ वाटेल

ancient palaces

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये अशा अनेक ऐतिहासिक आणि आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्येच भव्य महाल आणि राजवाड्यांचा विशेष समावेश आहे. भारतातील राजस्थान, जोधपुर, उदयपूर याठिकाणी तर जुन्या काळात बांधण्यात आलेले असे अनेक पॅलेस आहेत ज्या पॅलेसला भेट देण्यासाठी फॉरेन पर्यटक येत असतात. हे पॅलेस त्यांच्या सुंदरतेमुळे आणि नक्षीदार कामामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण याच पॅलेसची माहिती जाणून घेणार आहोत ज्याला तुम्ही देखील भेट देण्याची इच्छा व्यक्त करताल.

उम्मेद भवन पॅलेस, जोधपूर

राजस्थानमधील हा राजवाडा जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे. हा भव्य वाडा राजपूत आणि आर्ट डेको आर्किटेक्चरलची शैली प्रतिबिंबित करते. या राजवाड्याचे रूपांतर आता एका लक्झरी हॉटेलमध्ये करण्यात आले आहे तिथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे तुम्ही कधी जोधपुरला गेला तर या राजवाड्यालापॅलेस नक्की भेट द्या.

सिटी पॅलेस, जयपूर

जयपूरच्या मध्यभागी सिटी पॅलेस आहे. हे पॅलेस राजपूत, मुघल आणि युरोपियन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. या भव्य राजवाड्यामध्ये अनेक खोल्या, अंगण, बागा, सुंदर नक्षीकाम आहे. या राजवाड्याला पाहिल्यानंतर तुमचे डोळे दिपून जातील. तसेच या राजवाड्याची उभारणी पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल.

म्हैसूर पॅलेस, म्हैसूर

या राजवाड्याला अंबा विलास पॅलेस असेही म्हणले जाते. हा वाडा म्हैसूरच्या राजघराण्यातील वाडियार घराण्याचे निवासस्थान आहे. हा राजवाडा इंडो-सारासेनिक शैलीत बांधण्यात आला आहे. या राजवाड्यामध्ये करण्यात आलेले सुंदर, रेखीव काम सर्वांनाच थक्क करून सोडते. या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाडियार घराण्याचा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

लेक पॅलेस, उदयपूर

उदयपूरमधील पिचोला तलावावर स्थित लेक पॅलेस आहे. हे पॅलेस एक आकर्षक पांढरा संगमरवरी राजवाडा आहे. ज्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसते. परंतु आता या पॅलेसचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये राहिल्यानंतर देखील तुम्हाला एखाद्या राजासारखे वागवण्यात येते. तसेच, सन्मानपूर्वक आपल्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवला जातो.

जयविलास पॅलेस, ग्वाल्हेर

मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेरमध्ये असलेला हा राजवाडा सिंधिया राजवंशाचे निवासस्थान आहे. हा राजवाडा विलक्षण वास्तुकला, युरोपियन शैलीतील सजावट आणि रेखीव नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. हा राजवाडा आतून किती प्रमाणात सुंदर आणि आकर्षित असू शकतो हे आपल्याला राजवाड्याच्या बाहेरच दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही अशा राजवाड्यांना किंवा पॅलेसला नक्की भेट द्या.