Top Selling Cars : सध्या देशात अनेक कार निर्माण करणाऱ्या कंपन्या बाजारात नवनवीन कार लॉन्च करत आहेत. देशात कार खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. मागील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरचा महिन्यात एकूण कार विक्री 3,34,868 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षी (2022) नोव्हेंबरमध्ये विकल्या गेलेल्या कारच्या तुलनेत 3.98% अधिक आहे.
यामध्ये सर्वात मोठी आघाडी ही मारुती सुझुकीची आहे. त्याच वेळी, जर आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सबद्दल बोललो तर, मारुती वॅगन आर शीर्षस्थानी आहे, ज्याच्या एकूण 16567 युनिट्सची विक्री झाली आहे. मध्यमवर्ग लोकांना परवडणारी ही कार आहे. त्यामुळे लोक या कारला सर्वात जास्त पसंती देतात.
नोव्हेंबर 2022 मध्ये 14,720 युनिट्सची विक्री झाल्यामुळे मारुती वॅगन आरच्या विक्रीत वार्षिक 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर मारुती डिझायर आणि स्विफ्ट हॅचबॅक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. डिझायरच्या 15,965 युनिट्स आणि स्विफ्टच्या 15,311 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर टाटाची नेक्सॉन चौथ्या स्थानावर होती, ज्यांच्या 14916 युनिट्सची विक्री झाली आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला देशात नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या 20 कारबद्दल सांगणार आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 20 कार
1. मारुती सुझुकी वॅगनआर- 16567 युनिट्स विकल्या
2. मारुती सुझुकी डिझायर- 15965 युनिट्स विकल्या
3. मारुती सुझुकी स्विफ्ट- 15311 युनिट्स विकल्या
4. टाटा नेक्सॉन- 14916 युनिट्स विकल्या गेल्या
5. टाटा पंच- 14383 युनिट्स विकल्या
6. मारुती सुझुकी ब्रेझा- 13393 युनिट्स विकल्या
7. मारुती सुझुकी बलेनो- 12961 युनिट्स विकल्या गेल्या
8. मारुती सुझुकी एर्टिगा- 12857 युनिट्स विकल्या
9. महिंद्रा स्कॉर्पिओ- 12185 युनिट्स विकल्या
10. Hyundai Creta- 11814 युनिट्स विकल्या
11. Kia Seltos- 11684 युनिट्स विकल्या गेल्या
12. Hyundai Venue- 11180 युनिट्स विकल्या
13. मारुती सुझुकी Eeco- 10226 युनिट्स विकल्या
14. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स- 9867 युनिट्स विकल्या गेल्या
15. महिंद्रा बोलेरो- 9333 युनिट्स विकल्या गेल्या
16. Hyundai Exter- 8325 युनिट्स विकल्या
17. मारुती सुझुकी अल्टो- 8076 युनिट्स विकल्या
18. मारुती ग्रँड विटारा- 7937 युनिट्स विकल्या गेल्या
19. महिंद्रा XUV700 – 7221 युनिट्स विकल्या गेल्या
20. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा- 6910 युनिट्स विकल्या गेल्या