नवी दिल्ली । तुम्ही तुमच्या सर्व खर्चात कपात करून बचत करता आणि भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीच बचत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवता. मात्र आता बँक किंवा सरकारी बाँडमधील गुंतवणुकीवरील व्याज सातत्याने कमी होत आहे.
तसेच बाजारातही सतत अस्थिरता असते, अशा स्थितीत गुंतवणूकदारांसमोर अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की, आपला पैसा कुठे गुंतवावा, जिथे त्यांना चांगले रिटर्नही मिळेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित राहतील.
पैसे सुरक्षित असले पाहिजेत, कारण यामुळे अनेक लोकं आपले पैसे बँकेच्या FD मध्ये गुंतवतात. मात्र FD वरील घटत्या व्याजाने तुमचा उद्देश पूर्ण होत नाही.
जर तुम्हाला कमी कालावधीत चांगला रिटर्नही हवा असेल तर तुम्हाला तुमची बचत इतर योजनांमध्ये गुंतवावी लागेल. इथे तुमचा धोका वाढेल असे नाही, FD प्रमाणे ‘या’ योजनांमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित आहेत.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला FD पेक्षा जास्त रिटर्न मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, 1 ते 3 वर्षे कालावधीच्या गुंतवणुकीवर 5.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षांसाठी गुंतवले तर हे व्याज 6.7 टक्के होईल.
डेट फंड
जर तुम्हाला FD पेक्षा थोडा जास्त रिटर्न हवा असेल तर तुम्ही डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. डेट फंड हे म्युच्युअल फंडांच्या कॅटेगिरीपैकी एक आहेत. डेट म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बॉण्ड्स, गवर्नमेंट सिक्योरिटी, ट्रेझरी बिले आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर इत्यादींचा समावेश आहे.
डेट फंड कमी जोखमीसह चांगले रिटर्न मिळविण्यात मदत करतात. कारण म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा सर्वात फायदेशीर सौदा मानला जातो. जर तुम्ही व्याजदराची जोखीम घेऊ शकत नसाल तर तुम्ही लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड, शॉर्ट ड्युरेशन फंड इत्यादीसारख्या शॉर्ट डेट स्कीममध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही प्रमाणित फंड मॅनेजरच्या मदतीने डेट फंडात पैसे गुंतवू शकता. येथे तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट्स पेक्षा जास्त रिटर्न मिळतो.