अमरावतीतील हिंसाचार हा दुर्दैवी पण पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. “अमरावती येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असून काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर का बोलले जात नाही? या हिंसेमागे कोण होते? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असा प्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “अमरावती येथे झालेला हिंसाचाच्या घटनेचे तसेच कोणत्याही घटनेचे आम्ही समर्थन करीत नाही. राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर का बोलले जात नाही? या हिंसेमागे कोण होते? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? त्यांनी याबाबत खुलासा करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही.

हिंदूत्त्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्यांवर मुद्दाम कारवाई केली जात आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेबद्दल भाजप जबाबदार असल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. जे लोकं नव्हते त्यांनाही अटक होत आहे. निष्पाप लोकांना पोलीस अटक करत आहे. त्यांच्यावर ३०७ कलम लावत आहेत. अनेक लोकांवर एकतर्फी केसेस लावल्या जात आहेत. टार्गेट करुन केसेस होत आहेत. पोलीसांना आम्ही मदत करायला तयार आहोत. राजकीय दबावात पोलीस एकतर्फी कारवाई करत असेल तर भाजप जेलभरो आंदोलन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

You might also like