हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाजारात रोज नवनवीन आकर्षक Bikes येतच असतात ज्यांना Bike लव्हर्स कडून नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत असतो . बाईक खरेदी करताना ती देत असलेला मायलेज तसेच इंधनाची होणारी बचत आणि तिची एकूण किंमत लक्ष्यात घेऊनच आपण ती खरेदी करत असतो. नुकतीच हिरो कपंनीने आपली एक शानदार Hero Splendor Plus हि Bike बाजारात आणली आहे. ही बाईक तिच्या दमदार मायलेजसाठी ओळखली जाते. 87198 हजार रुपये एक्स शोरूम किंमत असलेली हि बाईक तुम्ही अवघ्या 4360 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतोच तत्पूर्वी आपण या गाडीची खास वैशिष्टये जाणून घेऊयात….
फीचर्स –
अत्यंत आकर्षक दिसणारी हि Splendor Plus Bike इतर बाईकच्या तुलनेत वजनाने खूपच हलकी आहे. बाईकचे एकूण वजन हे 112 kg आहे . वजन कमी असल्या कारणाने हि Bike अरुंद अश्या जागेतूनही अगदी आरामात मार्गक्रमण करू शकते . अरुंद ठिकाणी बाइक चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकल्यामुळे ती वळवण्यास जास्त कष्ट पडत नाही. बाइक स्मूथ आणि खराब अश्या दोन्ही रस्त्यांवर उत्तम परफॉर्मन्स देते . बाईकच्या सीटची उंची 785 mm आहे. ज्यामुळे कमी उंचीची व्यक्तीही सहजपणे ही Bike उत्तमरीत्या चालवू शकतात.
इंजिन –
गाडीच्या इंजिन बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये कंपनीने 97.2 cc चे इंजिन बसवले आहे. हे इंजिन 4 स्पीड manual ट्रान्समिशनला जोडलेलं असून 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हिरो च्या या बाइकमध्ये 9.8 लीटर ची फ्यूल टॅंक बसवण्यात आली आहे
4360 रुपयांत घरी घेऊन जा –
Hero Splendor Plus Bike 87198 हजार रुपयांत बाजारात उपलब्ध असून ती 4 वेरिएंट आणि 11 कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. bikewale वेबसाइट च्या मते फक्त 4360 रुपये डाउन पेमेंट देऊन आपण हि बाइक लोन स्कीममध्ये देखील खरेदी करू शकता . त्यासाठी 36 महीन्यांसाठी 9.5 % व्याज दरांत 2957 रुपये दरमहा भरून हि Bike आपल्या नावावर करता येईल.