गुजरातच्या कांडला बंदरातून 1439 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । गुजरातमधील कांडला बंदराजवळ एका कंटेनरमध्ये लपवून ठेवलेले 205.6 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केली. या हेरॉईनची एकूण किंमत 1439 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान इराणमधून येथे आलेल्या 17 कंटेनरपैकी एका कंटेनरमध्ये हेरॉइन सापडली होती अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

सोमवारी एक निवेदन जारी करताना DRI ने सांगितले की,”गुजरात ATS च्या मदतीने DRI ने उत्तराखंडमधील एका कंपनीने इराणच्या अब्बास बंदरातून कांडला बंदरात आयात केलेल्या मालाची तपासणी केली. यामध्ये 394 मेट्रिक टन वजनाच्या 10,318 बॅगांसह 17 कंटेनर आयात करण्यात आले आणि त्यात ‘जिप्सम पावडर’ असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.”

DRI ने पुढे सांगितले की, “आतापर्यंत 205.6 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे आणि ज्याची किंमत अंदाजे 1,439 कोटी रुपये आहे. या मालाची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी एका आरोपीला पंजाब मधून ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment