आणि राहुल गांधी तिला म्हटले मला फक्त राहुल म्हण, सर नको!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई | राहुल गांधी हे निवडणुकीचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच अनेक राज्यात दौरे करत आहेत. देशातील युवा बेरोजगारीच्या प्रश्नांवर ख़ास करून त्यांचे दौरे विशेष आहेत. राहुल गांधी हे आज तमिळनाडु राज्यातील चेन्नई येथील स्टेला मारिस कॉलेज आयोजित कार्यक्रमात एक ख़ास किस्सा घडला.

राहुल गांधी आज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्या दरम्यान एक मूलगी प्रश्न विचारण्यासाठी उठली आणि तिने राहुल गांधींना सर म्हणून हाक मारली..सर हाक मारताच राहुल यांनी तिला आपल्या शैलीत राहुल म्हणालीस तरीही चालेल अस सांगितलं या एवढ्या वाक्याने महाविद्यालयातील तरुण तरुणीनी जोरदार आवाज करून राहुल राहुल आवाज देत महाविद्यालय परिसर दणानून सोडला.

दरम्यान राहुल गांधी आज तमिळनाडु राज्याच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांनी राजकारणी पेहराव न घालता जीन्स आणि टी शर्ट घालून तरुणासोबत संवाद साधला. राहुल गांधींचा हटके पेहराव आजच्या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण होता.