मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता जमीन मंजूर केला आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्याने कदम हे तुरुंगात आहेत. त्यांना ३ ते ६ तारखेच्या दरम्यान निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जामीन मंजूर झाला आहे. रमेश कदम यांच्यासाठी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
अण्णा भाऊ साठे महामंडळात बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रमेश कदम हे राष्ट्रवादी पक्षाचे मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे २०१४ चे उमेदवार होते. ते आता अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यांना अटक झाल्यापासून त्यांचे विविध किस्से समोर आल्याचे बघायला मिळाले आहे. ईडीच्या न्यायायलाने त्यांना जमीन दिला असला तरी त्यांच्यावर सीआयडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे ते तुरुंगात आहेत.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रमेश कदम हे तुरूंगातूनच विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला त्यांच्या अपक्ष उमेदवारीने चांगलीच रंगत येणार आहे.