अहमदनगर प्रतिनिधी | सुशील थोरात ,
अहमदनगर महानगरपालिकेतील रस्त्याच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवकांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणात पोलिसांनी एका कार्यकर्त्यांसह नगरसेवक अशोक बडे यांना आता केली आहे मात्र आता पोलिस शिवसेना उपनेते अनिल राठोड त्यांच्या मागावर असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी काही पथके तयार केली आहेत.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं सांगताना दिसत आहे त्यामुळे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत सध्या ते पोलिसांना सापडत नसले तरी पोलीस मागावर असून या गुन्हा मधील नगरसेविका तसेच माजी नगरसेवक फरार आहेत त्यांचाही शोध आता पोलीस घेत असून या सर्व कारस्थान मागे राष्ट्रवादीचा हात असल्याचं शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी आरोप केला आहे