अदानीनंतर Hindenburg Report ने जॅक डोर्सीच्या ‘Block Inc.’ लावला सुरुंग, क्षणार्धात शेअर्स कोसळले

Hindenburg Research
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hindenburg Report : ज्याच्या रिपोर्टने एका महिन्यात देशातील दुसरा सर्वात श्रीमंत माणूस अनेक मैल मागे गेलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चला कोण विसरू शकेल. भारतासहीत जगभरातील अनेक देशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखालील पेमेंट कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असल्याचे म्हंटले आहे. यानंतर Block Inc.च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्याचे दिसून येते आहे.

Hindenburg published its report after a two-year investigation, the firm, run by Nathan Anderson, said in a report on published on its website and distributed via Twitter. (Jack Dorsey, Block Chairman in pic)

अमेरिकेच्या प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये सकाळी 8:53 वाजता Block Inc. चे शेअर्स 20% घसरून $58.35 वर आले. नियमित व्यावसायिक तासांपूर्वी ब्लूमबर्ग न्यूजकडूनकरण्यात आलेल्या ईमेलला Block Inc.ने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. Hindenburg Report

Hindenburg's next target is Block, ex-Twitter CEO Jack Dorsey-led payments  firm - Hindustan Times

हिंडनबर्गने दोन वर्षांच्या रिसर्चनंतर आपला रिपोर्ट रिलीज केला आहे. नॅथन अँडरसनद्वारे चालवल्या जाणाऱ्या फर्मने आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या आणि ट्विटरद्वारे डिस्ट्रिब्युट केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे जाणून घ्या कि, ब्लॉकचे अध्यक्ष असलेले जॅक डॉर्सी हे ट्विटरचे सह-संस्थापक देखील होते. Hindenburg Report

Live news: Hindenburg launches attack on Jack Dorsey's payment group Block  | Financial Times

जानेवारीमध्ये या फर्मने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सबाबत अकाऊंटिंगमधील फसवणूक आणि स्टॉक मॅनिप्युलेशनच्या आरोप करत विक्री सुरू केली. सप्टेंबर 2020 मध्येही हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे इलेक्ट्रिक-वाहन निर्मात्या निकोला कॉर्पोरेशनचे शेअर्स घसरले. त्यानंतर कंपनीचे संस्थापक ट्रेव्हर मिल्टन यांच्यावर फौजदारी आरोप लावण्यात आले. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना ऑक्टोबरमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. Hindenburg Report

Hindenburg Research Targets Jack Dorsey-led Payments Firm Block, After  Gautam Adani | 10 Points

यापूर्वीही केले आहेत अनेक खुलासे

हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक असलेल्या नॅथन अँडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमधील पदवी प्राप्त केली आहे. याआधीही, सप्टेंबर 2020 मध्ये हिंडनबर्गने इलेक्ट्रिक ट्रक निर्मात्या निकोला कॉर्प विरुद्ध रिपोर्ट रिलीज केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, निकोलाने जूनमध्ये व्यवसाय सुरू केला आणि लवकरच त्याचे मूल्यांकन $ 34 अब्जपर्यंत पोहोचले आणि फोर्डलाही मागे टाकले. या रिपोर्टनंतर, जानेवारी 2023 पर्यंत, निकोलाचे मूल्य $1.34 अब्ज पर्यंत खाली आले आहे. Hindenburg Report

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hindenburgresearch.com/

हे पण वाचा :
आर्थिक मंदीचं सावट? IT सेवा फर्म Accenture 19 हजार नोकरकपात करणार
Mukesh Ambani बनले जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती, पहा लिस्ट
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला कोट्यवधींचा नफा
FD Rates : ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवण्याची शेवटची संधी !!!
10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम