हिंदू बांधवानी हनुमान मंदीरात इफ्तार पार्टी देत हिंदू – मुस्लिम एकतेचे घडवले दर्शन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी ( गजानन घुंबरे) : हॅलो महाराष्ट्र – सध्या हनुमान चालीसा, मजीदवरील भोंगे यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, परभणी जिल्ह्यातील पाथरी शहराने हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन घडवले असून, शहरातील हनुमान मंदिरातच, मुस्लिम बांधवासाठी इफ्तार चे आयोजन करण्यात आले. हिंदू धर्मीयांकडून हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तारला, शहरातील मुस्लिम समाजाने हजेरी लावली.

विशेष म्हणजे राज्यात जो वाद सुरू आहे, तो केवळ राजकीय फायद्यासाठी सुरू असून, हिंदू-मुस्लीम एक असल्याचा नारा यावेळी देण्यात आला. पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी येथील जागृत हनुमान मंदिरात मंगळवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी सर्वधर्मीयांमधील समरसतेची भावना दर्शवणाऱ्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आ. बाबाजानी दुर्राणी ,जुनेद दुर्राणी,अनिल नखाते, शहरातील डॉक्टर,पत्रकार,व्यापारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. या इफ्तारचे आयोजक पिंटू बाहेती, सुनील उन्हाळे, जयंतराव कुलकर्णी, गजानन टोके यांनी केले होते.

Leave a Comment