नागपूर । ‘हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते,’ असे वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
भाजपशासित राज्यांप्रमाणे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा!- किरीट सोमय्या
वाचा सविस्तर-👉 https://t.co/4QwKQy60Ix@BJP4Maharashtra @KiritSomaiya @CMOMaharashtra @ShivSena #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 21, 2020
मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करा! दरेकरांचा नितीन राऊतांना खोचक सल्ला
वाचा सविस्तर-👉 https://t.co/FBaUYymedL@NitinRaut_INC @mipravindarekar @BJP4Maharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 21, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in