हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 50 लाखांचा गुटखा जप्त

0
112
gutakha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली | शनिवारी साडेतीन वाजेच्या सुमारास वसमत याठिकाणी विक्रीसाठी आलेला 50 लाख रुपयांचा वजीर गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालकाची पोलिसांनी कसून चौकशी केली. हा गुटखा बंगलोर या ठिकाणहुन याची प्राथमिक चौकशी मध्ये स्पष्ट झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये 50 बोरी गुटका वसमत शहरात आज सकाळी दाखल झाला. हा कंटेनर वसमत ते परभणी मार्गावर उड्डाणपुलाच्या खाली थांबला होता. याबाबत गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक विलास खारडे, जमादार भगीरथ सवंडकर, साईनाथ कंठे, प्रशांत मुंडे, बालाजी जोगदंड, दिलीप पोले यांच्या पथकाने कंटेनर उभ्या असलेल्या ठिकाणी भेट दिली.

या कंटेनर मध्ये काय आहे याची माहिती चालक परवेज पाशा याला विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर उघडून पाहिले असता त्यांना वजीर गुटख्याच्या 50 बोऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. हिंगोली ते कर्नाटक या मार्गांवरील गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here