हिट अँड रन: आता रस्ते अपघातातील नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार, त्याविषयी जाणून घ्या

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हिट अँड रन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम 25,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन रस्ते अपघातग्रस्तांसाठी भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली आहे. ज्यामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

हिट अँड रन: आता रस्ते अपघातातील नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार, त्याविषयी जाणून घ्यामंत्रालयाने बुधवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हिट अँड रन अपघातग्रस्तांच्या भरपाईसाठी योजना बदलण्याची गरज आहे. गंभीर दुखापतीसाठी 12,500 ते 50,000 रुपये आणि मृत्यूसाठी 25,000 ते 2,00,000 रुपये. ही योजना 1989 मध्ये केलेल्या भरपाई योजनेच्या जागी लागू केली जाईल.

2019 मध्ये दिल्लीमध्ये 536 लोकांचा मृत्यू झाला
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले की, 2019 मध्ये दिल्लीमध्ये ‘हिट अँड रन’ रस्ते अपघातात 536 लोकं ठार झाले आणि 1,655 लोक जखमी झाले. मंत्रालयाने या प्रस्तावित योजनेसाठी 30 दिवसात भागधारकांच्या प्रतिक्रिया देखील मागितल्या आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देशात एकूण 4,49,002 रस्ते अपघातांमध्ये 1,51,113 लोकांचा मृत्यू झाला.

मोटार व्हेईकल एक्सीडेंट फंडची स्थापना केली जाईल
ड्राफ्ट स्कीमअंतर्गत, मंत्रालयाने रस्ते अपघातांची सविस्तर तपासणी, अपघाताचा तपशीलवार रिपोर्ट आणि त्याचा रिपोर्ट तसेच दाव्यांच्या जलद निराकरणासाठी विविध भागधारकांसाठी वेळ मर्यादा प्रस्तावित केली आहे. सरकार मोटर व्हेईकल एक्सीडेंट फंड तयार करेल, ज्याचा वापर हिट अँड रन अपघात झाल्यास भरपाईसाठी आणि अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी केला जाईल.