हिटलरच्या मिशा आणि चेहऱ्यासारखा दिसत होता Amazon चा नवीन लोगो, युझर्सनी ट्रोल करताच बदलावा लागला Logo

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनने आपल्या नवीन अ‍ॅप लोगोची रचना बदलली आहे. मागील डिझाइनसाठी ग्राहकांकडून मिळालेल्या नकारात्मक फिडबॅकनंतर कंपनीला हे करावे लागले. बर्‍याच सोशल मीडिया युझर्सनी अ‍ॅमेझॉनच्या या नवीन लोगोस हिटलरच्या मिशाशी लिंक केले आणि त्याच्या चेहऱ्याशी जोडले.

हा नवीन अ‍ॅप लोगो यावर्षी जानेवारीमध्ये लाँच केला गेला. यात तपकिरी कार्डबोर्ड बॉक्सच्या कंपनीची सिग्नेचर स्माइल आणि टॉप वर निळ्या रंगाची टेप दिसत होती. लोकांनी याचा संबंध हिटलरशी जोडला होता. आता अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅप लोगोची रचना बदलली आहे. अपडेटेड अ‍ॅमेझॉन अ‍ॅप लोगो कोणत्याही प्रकारचा विवाद टाळण्यासाठी दिसते आहे, आता त्या तपकिरी कार्डबोर्ड बॉक्सवर टूथब्रश मिशाऐवजी निळ्या रंगाची टेप खाली वळविली गेली आहे तसेच इतर डिझाइन आणि कंपनीची सिग्नेचर स्माइल आधीच्या लोगो सारखाच आहे.

निळ्या रंगाच्या टेप डिझाइनला युझर्सनी केले ट्रोल
या निळ्या रंगाच्या टेपच्या डिझाइनपासून संपूर्ण वाद सुरू झाला. बर्‍याच सोशल मीडिया युझर्सनी अ‍ॅमेझॉनच्या या नवीन लोगोस हिटलरच्या मिशाशी लिंक केले आणि त्याच्या चेहऱ्याशी जोडले, तर अनेक लोकांनी कंपनीला लोगोच्या डिझाइनबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगितले. वास्तविक, कंपनीने 25 जानेवारी 2021 रोजी आपल्या अ‍ॅपवर हा नवीन लोगो अपडेट केला होता, त्यानंतर त्यावर प्रश्न उपस्थित होण्यास सुरवात झाली. महत्त्वाचे म्हणजे, टूथब्रश डिझाईन मिशा मूळतः चार्ली चॅपलिन सारख्या विनोदकारांनी 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस लोकप्रिय केली होती, जरी ती नेहमी अ‍ॅडॉल्फ हिटलरशी संबंधित राहिली असली, परंतु त्यापेक्षाही ती आधीपासूनच प्रचलित होती.

Amazon Changes New Logo After People Said It Looked Like Hitler

मिंत्रालाही लोगो बदलावा लागला
ई-कॉमर्स वेबसाइट मिंत्रानेही अलीकडेच आपला लोगो देखील बदलला आहे. कंपनीचा लोगो महिलांसाठी ‘आक्षेपार्ह’ म्हणून वर्णन करण्यात आले आणि या प्रकरणी मुंबई सायबर क्राइम पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर कंपनीने लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.