Sunday, May 28, 2023

युवकांनी सक्रिय राजकारणात यायला हवे : अतुल शितोळे

पुणे | आपला भारत हा युवकांचा देश आहे आणि युवकांनी आता राजकारणात यायाला हवे असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड महानगपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी आज बोलताना केले.

आज पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदांची जबाबदारी विविध कार्यकर्त्यांकडे देण्यात आली. त्यावेळी मयूर मधाळे याची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. अतूल शितोळे यांनी मयुरचा सत्कार केला व त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

“निव्वळ राजकरण हा आपला प्रांत नाही. असं म्हणून जबाबदारी संपत नसते तर ती जबाबदारी समजून आज प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. यावेळी मयूर मधाळे यांनी अतुल शितोळे यांचे आभार मानले.या कार्यक्रमाला अधिराज शितोळे,सुजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.