सलून व पार्लर बंद निर्णयाच्या आदेशाची होळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांचे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे. शासनाच्या निर्णयाची होळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊनच सलून दुकाने बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे करण्यात आली.  निवेदनात मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे, जिल्हाध्यक्ष संभाजी वाघ यांनी केली आली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अभियानांतर्गत ३० एप्रिल पर्यंत रात्री संचारबंदी, विकेंडला लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, सलून, ब्युटी पार्लर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नाभिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. वर्षभरापासून आधीच नाभिक बांधव संकटात आहेत. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील १६ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. यावर्षी सलून व्यावसायिकांवर भयावह परिस्थिती आहे.

शासनाने सलून बंद या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. अशी मागणी करत शासनाने घेतलेंल्या निर्णयाची होळी ५ एप्रिलला कैलासनगर येथे करण्यात आली. शासनाने सलून व्यावसायिक आणि नाभिक बांधवाना भरघोस आर्थिक मदत करावी. योग्य नियम आणि अटींच्या आधारावर सलून दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी विष्णू वखरे, संभाजी वाघ, अप्पासाहेब दळवी, नवनाथ घोडके, सोमनाथ दळवी, मोहन वाघ, कृष्णा ठाकरे, सागर वाघ, अशोक ठाकरे, शांतीलाल जंगम, संतोष मगर, अक्षय बेलकर, संजय औटे, सुदाम पंडित, सोमनाथ दळवी, अतुल शेजुळ, दत्ता कापसे, अशोक वाघ, प्रतीक वाघ, भूषण ठाकरे, गणेश जाधव यांच्यासह पदाधिकारी, समाज बांधवानी यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment