शहरात ‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी

बाजारपेठा बंद असल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोराना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशाने जारी करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून आज बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली. प्रशासनाने विश्वासात न घेता तसेच पूर्वकल्पना न देता अचानक दुकाने बंद करायला लावल्याने व्यापाऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच दुकाने बंद झाल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची देखील तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाले.

राज्यावर टाळेबंदीचे काळे ढग ऐन उन्हाळ्यात घोंगावत आहेत. वर्षभरापूर्वी अशीच टाळेबंदी लागू झाली होती. मात्र अर्थचक्र सुरू ठेवायचे असेल तर सामूहिक ठिकाणी होणारी गर्दी टाळायची असेल तर ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच आज शहरात बहुतांश भागात तसेच व्यापारीपेठांत व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या काळात शहरात रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी असेल. गर्दी होईल अशा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना आता मनाई असेल. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही टाळेबंदी असणार आहे. त्यानुसार ऐंशी टक्के बाजारपेठा बंद असणार आहेत.

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यावरून आपल्यासमोरचे आव्हान समजून येईल. अंशत: टाळेबंदीचे रुपांतर पूर्ण टाळेबंदी होऊ नये यासाठी आता सर्वांनीच जबाबदारी घ्यायला हवी. या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या कठोर निर्बंधाचा फटका सर्वच क्षेत्रांना प्रामुख्याने बसणार आहे. शहरात गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरा, शहागंज,सिटी चौक या भागांतील सर्वच दुकाने व व्यापारीपेठा आज बंद होत्या.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like