हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली तिच्या निखळ सौंदर्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच ती बऱ्याचदा इतरांपेक्षा वेगळे आणि हटके फोटोशूटही करत असते ज्यामुळे ती अत्यंत चर्चेतही जाते. या वेगवेगळ्या फोटोशूटसाठी अँजेलिना नेहमीच काहीतरी जगावेगळं करीत असते. जे अगदीच शक्य आहे त्यापेक्षा खूप वेगळ काहीतरी करण्याचा तिचा नेहमीच हट्टाहास असतो. मात्र यावेळी तिने जे केलाय ते पाहून तर सगळ्यांनी बोटं तोंडात घातली आहेत. ना फोटोशॉप ना एडिटिंग यावेळी तिने चक्क खऱ्या खुऱ्या मधमाशांना अंगावर घेऊन फोटोशूट केले आहे. यामुळे तिच्या या धाडसी फोटोशूटचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे आणि खूप व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CPKNqrbDFmZ/?utm_source=ig_web_copy_link
अँजेलिना जोलीने हे फोटोशूट आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवसाच्या निमित्ताने केले आहे. असं म्हणता येईल कि तिने हा दिवस साजरा करण्यासाठी हे हटके शूट केले आहे. अँजेलिनाने या फोटोशूटसाठी जवळपास एक हजार मधमाशांना अंगावर घेतले आहे. वायरल झालेल्या या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कित्येक मधमाशा अँजेलिनाच्या कपड्यांवर आहेत. तर तिचा गळा, खांदे आणि तोंडावरही फक्त मधमाशा पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये अँजेलिनाने एक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळे तिच्या शरीरावर असणाऱ्या मधमाश्या फोटोत दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/p/COkkhnZnvxq/?utm_source=ig_web_copy_link
अशी माहिती आहे कि, या मधमाशा डैन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाशा आहेत. हे फोटोशूट नॅशनल जिओग्राफिकच्या सौजन्याने केले गेले आहे. विशेष म्हणजे अँजेलिनाच्या अंगावर जवळपास १८ मिनिटे या मधमाशा होत्या. डैन विन्टर्स यांच्या माहितीनुसार, मधमाशा शांत राहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची इजा करू नये, यासाठी शूटच्या टीमकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. मधमाश्यांचा डंख न साहणारा असतो. त्यामुळे खूप काळजी घेत हे फोटोशूट पूर्ण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. अँजेलिनाच्या या धाडसाचे काही चाहते अगदी तोंडभरून कौतुक करत आहेत. तर काहीजण तिची खिल्ली उडवीत आहेत.