हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : महागाईला तोंड देण्यासाठी RBI ने पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर 2022 रोजी याबाबत घोषणा करताना रेपो दर 35 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.25% केला आहे. आता याचा फटका सर्वसामान्यांना बसणार हे निश्चित आहे.
कारण आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होम लोन (Home Loan) वरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामध्ये मोठ्या सरकारी बँकांचाही समावेश आहे. चला तर मग आतापर्यंत कोण-कोणत्या बँकांनी होम लोन वरील व्याजदर वाढवले आहेत ते पाहूयात…
इंडियन ओव्हरसीज बँकेने मार्जिनल कॉस्ट (MCLR) मध्ये 15-35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. याशिवाय बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्येही 9.10 टक्के केला आहे. 10 डिसेंबरपासून हे नवीन दर लागू केले जातील. Home Loan
आता बँक ऑफ बडोदानेही की रिटेल लोनसाठीचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.85 टक्के केला आहे, जो 8 डिसेंबरपासून लागू केला गेला आहे. यामध्ये रेपो दराच्या 6.25 टक्के आणि 2.60 टक्क्यांच्या मार्कअपचा देखील समावेश आहे. Home Loan
बँक ऑफ इंडियाने देखील रेपो बेस्ड लोन रेट (RBLR) 9.10 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय 1 वर्षाचा MCLR 8.15%, 6 महिन्यांचा MCLR 7.90% करण्यात आला आहे. 7 डिसेंबरपासून हे बदल लागू करण्यात आले आहेत. Home Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bankofindia.co.in/web/guest/interest-rate-mclr-2022
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा