रतन टाटांचे मॅनेजर शंतनुची इमोशनल पोस्ट; कोणती भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे सहाय्यक शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांची एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शंतनू हे वृद्धांची सेवा करण्यासाठी स्टार्टअप गुडफेलो चालवतात, ज्यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. शंतनूने (Shantanu Naidu) LinkedIn या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुडफेलो इंडिया सुरू करण्याविषयी सांगितले आहे.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट
शांतनु नायडू (Shantanu Naidu) यांनी एका पंजाबी जोडप्याची गोष्ट सांगितली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये शांतनु नायडू यांनी या जोडप्याचे स्वागत केले होते. विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी त्यांची कशी काळजी घेतली हे सांगितले. यानंतर शांतनु यांनी या जोडप्याबरोबर वेळ घालवण्यास सुरुवात केली.

‘कोणती भेट शेवटची’
शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांनी लिहिले- ‘त्या गृहस्थांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या या करुणेने माझ्या मनावर इतका खोल ठसा उमटवला आहे की, गुडफेलो का सुरू झाला असे जेव्हा कोणी विचारते तेव्हा श्रीमान पंजाबींचा चेहरा नेहमीच माझ्यासमोर येतो. नायडू गेल्या वर्षी मुंबईत गुडफेलो कार्यक्रमात श्री पंजाबी यांना भेटले होते. नायडूंनी पुढे लिहिले- ‘यावर्षी त्याची खूप आठवण येईल. कोणती बैठक शेवटची आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही.

शंतनू 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत
गुडफेलो सप्टेंबर 2022 मध्ये लाँच केले गेले. हा स्टार्टअप सुरू करणारे शंतनू नायडू हे 30 वर्षांचे असून त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. सध्या ते टाटा कार्यालयात महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच शंतनू (Shantanu Naidu) 2018 पासून रतन टाटा यांच्याशी संबंधित आहेत. रतन टाटा यांनी गुडफेलोमध्ये किती गुंतवणूक केली आहे हे अद्याप उघड झाले नाही.

गुड फेलो म्हणजे काय?
हे स्टार्टअप तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या स्टार्टअपची प्रगती पाहून खूप आनंद होईल असे टाटा यांनी लॉन्चिंगच्या प्रसंगी सांगितले होते. शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांनी रतन टाटांसोबतच्या अनुभवाबद्दल ‘आय कॅम अपॉन अ लाइटहाऊस’ हे पुस्तकही लिहिले आहे. भटक्या कुत्र्यांसाठी केलेल्या कामामुळे शंतनू रतन टाटा यांच्या जवळ आला. रतन टाटा हे मुंबईचे रहिवासी शंतनू नायडू यांच्यावर इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः फोन करून शंतनूला नोकरीची ऑफर दिली.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या