गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले-“सहकार क्षेत्र देशाला 5000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकते”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की,”सहकार क्षेत्रामध्ये भारताला 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यातही ते मोठे योगदान देऊ शकते.” “तसेच सहकार मॉडेलची अंमलबजावणी केल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास होऊ शकतो,” असेही ते म्हणाले. लाल बहादूर शास्त्री यांचे श्वेतक्रांतीचे स्वप्न आज साकार होत असल्याचे ते म्हणाले. आता त्यापलीकडे पाहण्याची वेळ आली आहे. कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी सहकारी मॉडेल राबविण्याची गरज आहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,”दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या अमूलच्या यशामागे सहकारी मॉडेल हे सर्वात मोठे कारण आहे.” अमूलला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की,”तुम्ही 36 लाख शेतकरी कुटुंबांपुरते मर्यादित राहू नका. आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. भारतात आणि जगात त्यांची कृषी उत्पादने विकण्यासाठी त्यांच्याकडे योग्य व्यासपीठ नाही. अमूलसारख्या सहकारी संस्था या कामात मदत करू शकतात का, असा सवाल त्यांनी केला. आता या दिशेने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.”

‘भाज्यांच्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना फायदा’
बियाणांच्या क्षेत्रात वेळेवर संशोधन झाले नाही, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार क्षेत्रानेही या दिशेने काम केले पाहिजे. या भागात भाजीपाल्याच्या नवीन वाणांचा विकास झाला पाहिजे. याचा फायदा खासगी कंपन्यांना नसून शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होण्यास मदत होणार आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे.’

महिला सक्षमीकरणातील अमूलच्या भूमिकेचे कौतुक केले
शाह यांनी महिला सक्षमीकरणासाठी अमूलच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की,” जुलै 2021 मध्ये तयार करण्यात आलेले नवीन सहकार मंत्रालय आपली सनद तयार करत आहे.” अमूलला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांच्या हस्ते टपाल तिकीटही जारी करण्यात आले. त्यांनी अमूल ब्रँडचे सेंद्रिय खतही लाँच केले. 1946 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादकाचे संस्थापक आणि आणंद येथील सहकारी क्षेत्राचे नेते त्रिभुवनदास पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहकारी चळवळ म्हणून अमूलची स्थापना झाली. गुजरातमध्ये सुमारे 36 लाख शेतकरी कुटुंबे अमूलशी संबंधित आहेत.

Leave a Comment