हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी समोर येत असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील पोलीस भरतीबाबत हत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. मात्र, येत्या 31 डिसेंबर पूर्वी 5 हजार 200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार आहेत अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्यात पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. याची दोन टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये पोलीस दलामध्ये एकूण 5 हजार 200 जागांसाठी कोणत्याही परिस्थितीत पदभरती केली जाईल. तसेच यानंतर पुढे उर्वरित 7 हजार जांगाची भरती केली जाईल”, असं वळसे पाटील म्हणाले
आज औरंगाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांची भरती केली जाणार असून डिसेंबर २०२१ पूर्वी यापैकी ५ हजार २०० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित ७ हजार पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली. pic.twitter.com/GInRzDGTzt
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) July 12, 2021
दरम्यान, कोरोना मध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.