हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याच्या मुद्यांवरून आवाज उठवल्या नंतर राज्यातील वातवरण गरम झाले आहे. याच दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एका सभेतील भाषणा दरम्यान अजान सुरू होताच त्यांनी आपल भाषण मधेच थांबवल्याची घटना घडली आहे. वळसे पाटील यांनी आपल्या कृतीतून एक जातीय समानतेचा संदेश दिला आहे.
पुण्यातल्या शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील जनसभेला संबोधित करत होते. त्याचवेळी अजानचा आवाज त्यांच्या कानी पडला. यानंतर पाटील यांनी भाषण थांबवलं. त्यांनी उपस्थितांनादेखील शांत राहण्यास सांगितलं. या घटनेची सध्या परिसरात चर्चा आहे. एएनआयनं या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
#WATCH Maharashtra Home Minister Dilip Walse Patil halts his speech midway for Azaan, at an event in Shirur, earlier today pic.twitter.com/IpV35YuIAr
— ANI (@ANI) April 4, 2022
दरम्यान, वळसे पाटील यांना याबाबत विचारले असता कोणत्याही धर्माचा आदर करणे ही माझी पद्धत आहे. पण सध्या देशाच्या विकासावर बोलायचे सोडून मशिदींवरील अजानला विरोध केला जातो. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात वाद निर्माण करुन राजकराण अस्थिर करण्याचे काम सध्या राज्यात सुरु आहे. यामुळे राजकारण अस्थिर होणार नाही, पण देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात, असे त्यांनी म्हटले.