पचनक्रिया वाढवून लिव्हर ची कार्यक्षमता वाढवण्याचे काही घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। कोणत्याही वयातील व्यक्तीच्या शरीरातील पचनक्रिया चागली असणे फार गरजेचे असते. जर माणसाची पचनक्रिया चांगली नसेल तर त्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पोटदुखी , गॅस यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तीची पचनक्रिया ही उत्तम असते त्याचे आरोग्य हे अतिशय उत्तम रित्या कार्यरत राहते . त्यामुळे पचनक्रिया ही कशी चांगली राहील त्याकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. पचनक्रिया ही उत्तम ठेवणे कधीही चांगले.त्यासाठी पचनास जड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नये.

लिंबू :

आपण आपल्या आहारामध्ये लिंबाचा समावेश नियमितपणे करावा. जेवताना लिंबाची एक फोड खावी लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतात. तसेच पोटात ज्या पद्धतीचा गॅस साचला जातो तो बाहेर निघण्यासाठी आणि पचायला मदत करण्यासाठी लिंबू पाणी पिले जावे. तसेच लिंबामध्ये ऑंटीएक्सीडेंट देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. लिंबामुळे आपले शरीर ताजेतवाने राहते. तसेच लिंबाचे सेवन केल्यामुळे लिव्हर मध्ये असलेली इतर घाण देखील साफ होते. त्यामुळे लिव्हर चांगल्या प्रकारे कार्यरत राहते. लिव्हर च्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी मदत करण्याचे काम लिंबू करत असते.

हळद —

हळद ही आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपाय आहे. अनेक आजरांवर हळद ही उपयोगी पडते. हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे
जखमेवर तसेच इतर आजरांवर हळद लाभकारी आहे.हळदीमध्ये कर्क्युमिन हा पदार्थ असतो. त्यामुळे आपल लिव्हर साफ होण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्वे देखील असतात. त्यामुळे आपले लिव्हर चांगल्या प्रकारे कार्य करते

हिरव्या पालेभाज्या —

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या चे सेवन करून आपण लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे पालेभाज्यांची सेवन करून आपले शरीर सुदृढ ठेवावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’