बेघर लोकांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयोगाने काढला खास पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर (Lok Sabha Election 2024) केल्यात. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, मतदानाची तयारी आयोगाकडून सुरु आहे. मात्र देशात असेही काही मतदार आहेत ज्यांना घर नाही, ते बेघर आहेत त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने आश्वासक असा तोडगा काढला आहे. त्यामुळे असे लोक सहज मतदान करू शकतात. यासाठी अशा मतदारांना (Homeless Voters) नेमकं काय करावं लागेल ते आज आपण जाणून घेऊयात…

नवीन मतदारांसाठी, बूथ लेव्हल ऑफिसर रात्रीच्या वेळी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर (फॉर्म 6) भेट देतात आणि बेघर व्यक्ती त्या ठिकाणी झोपली आहे की नाही हे तपासतात. अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सदर मतदाराच्या वास्तव्याचा कागदोपत्री पुरावा आवश्यक नाही. या प्रक्रियेद्वारे, प्रत्येक पात्र नागरिकाला, सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता, मतदानाचा अधिकार मिळेल याची खात्री निवडणूक आयोगाने केली आहे.

फॉर्म-6 म्हणजे काय?

फॉर्म क्रमांक 6 हा भारतीय निवडणूक आयोगाने नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जाणारा अर्ज आहे. जे मतदार प्रथमच मतदान करणार आहेत किंवा ज्यांनी त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे अशा लोकांसाठी हा फॉर्म तयार करण्यात आला आहे.

बेघर मतदार पुढीलप्रमाणे मतदान करू शकतात

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा ‘व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲप’ वापरून फॉर्म 6 ऑनलाइन भरू शकता.

या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, वय, जन्मतारीख, जन्म ठिकाण, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादींची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल.

तसेच यासोबत तुम्हाला तुमचा फोटो आणि ॲड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक येईल, ज्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्राबाबत स्टेटस जाणून घेऊ शकता. मतदार ओळखपत्र जारी होण्यासाठी सुमारे 30 दिवस लागू शकतात.