हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लहान वयातील मुलांना सुद्धा केस पांढरे होण्याचा धोका असतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक मुलं मुली पहिल्या असतील की त्यांचे केस हे लहान वयातच पांढरे पाहायला मिळतील. त्याचे कारण म्हणजे लोकांच्या आहारात तसेच राहणीमान यामध्ये झालेले बद्धल होय. आहार योग्य नसेल तर त्याचा शारीरिक तसेच मानसिक त्रास सुद्धा जास्त जाणवते.
आजकाल तरुण वयात केस पांढरे होणे सामान्य आहे, आयुष्याच्या या धावपळीत लोकांना मानसिक तणावातून जावे लागते, अधिक चिंतेमुळे सुद्धा केस पांढरे होण्याची समस्या येते. अगदी लहान वयातच औषधे घेणे देखील केस पांढरे होण्याचे कारण बनू शकते.
केसांच्या समस्येपासून त्वरीत मुक्ती मिळण्यासाठी बहुतेक लोक रासायनिक पदार्थ असलेल्या बर्याच गोष्टींचा वापर करतात, परंतु त्यांच्या समस्या कमी होत नाहीत, त्याऐवजी अधिक केस पांढरे होण्यास सुरवात होते. पांढर्या केसांच्या समस्येमुळे प्रत्येक माणूस खूपच काळजीत असतो, खासकरून जर लहान वयात केस पांढरे झाले तर त्या व्यक्तीला सुद्धा खूप लाज वाटायला लागते. अनेक चुकीच्या केमिकल चा वापर आरोग्यासाठी जास्त नुकसानकारक असते. त्यामुळे शक्यतो रासायनिक पदार्थ याचा वापर करणे टाळले पाहिजे.
— काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे कोंडा होण्याची कोणतीही समस्या राहत नाही.
— काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी असतात जे केस मुळांपेक्षा मजबूत बनवते.
— कोणालाही केस गळतीची समस्या असल्यास, काळी मिरी त्यांच्यासाठी फा-यदेशीर मानली जाते, काळी मिरी केसांच्या फॉलिकल्स उत्तेजित करतात, ज्यामुळे आपले केस व्यवस्थित राहतात.
—काळी मिरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट टाळूच्या संसर्गाशी लढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आपले केस गळत नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’