Honda Shine 100 लाँच; Splendor ला देणार टक्कर, पहा किंमत अन वैशिष्ठ्ये

Honda Shine 100
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Honda ने आपली नवीन बाईक Honda Shine 100 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. आत्तापर्यंत होंडाच्या 100 सीसी सेगमेंट मध्ये फक्त Splendor चा समावेश होता, परंतु आता Shine च्या एन्ट्रीमुळे Splendor समोर आव्हान उभं राहील आहे. Honda Shine 100 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिष्ठ्ये ….

Honda Shine 100

फीचर्स – (Honda Shine 100)

होंडा Shine 100 ला 1,245 मिमी व्हीलबेस, 786 मिमी सीटची उंची आणि 168 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. यामध्ये साइड स्टँडसह इनहिबिटर, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसह इक्वलायझर, PGM-FI तंत्रज्ञानाचा समावेश आहे. गाडीची डिझाईन Honda Shine 125 ला डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आली आहे. नवीन Honda Shine 100 मध्ये ऑल-ब्लॅक अलॉय व्हील, अॅल्युमिनियम ग्रॅब रेल, स्लीकर लुकिंग मफलर, हॅलोजन हेडलॅम्प्स आणि बोल्ड टेल-लॅम्प्स मिळतात.

Honda Shine 100

इंजिन आणि कलर –

होंडा Shine 100 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 99.7cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 7.6hp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक लाल, निळा, हिरवा, सोनेरी आणि काळा या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. होंडा Shine 100 ची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी कडून या बाईकवर 3 वर्षांची वॉरंटी मिळते. या गाडीचे बुकिंग सुरु झाले असून मे महिन्यापासून डिलिव्हरी करण्यात येणार आहेत.