धक्कादायक!! जेवणासाठी मटण दिलं नाही म्हणून ढाबाचालकास मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉटेलवर जेवायला गेल्यांनतर मटण दिले नाही नाही म्हणून ढाबा चालकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग ढाब्यावर ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन करवले, राहुल करवले, शुभम काटकर, महेश सावंत (सर्व रा. सातारा- होलार गल्ली) हे चार जण जेवणासाठी वाघेराची जाळी या बस थांब्याशेजारी असलेल्या निसर्ग ढाब्यावर गेले होते. तेथे त्यांनी मटणाची ऑर्डर दिली. परंतु तेव्हा हॉटेलवर मटण नाही असं म्हणत संदेश लोहार यांनी त्यांना आपण महाबळेश्वर येथून मटण आणून बनवून देतो, असे सांगितले. त्यानंतर टू व्हीलर वरून संदेश रमेश लोहार व त्याचा मावसभाऊ हे दोघे मटण आणण्यासाठी महाबळेश्वरला जात होते. त्यांच्या गाडीपुढे त्या युवकांचे वाहन होते. त्याचवेळी या युवकांनी रात्रीच्या अंधारातच आपले वाहन थांबवून संदेश रमेश लोहार व विलास सुतार या दोघांना बेदम मारहाण केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेनंतर सदर हॉटेल मालकाने ही पोलिस ठाण्यात फोन करून ही घटना त्यांच्या कानावर घातली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आला. याप्रकरणी पोलिस निरिक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रऊफ इनामदार तपास करत आहेत.