Honeymoon Destinations In Maharashtra | सध्या गुलाबी थंडीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. ज्याप्रमाणे पावसाळ्यात निसर्ग हिरवी शाल पांघरून बसलेला असतो. तसेच हिवाळ्यात धुक्यानी भरलेला निसर्ग मनाला एक सुखद आनंद देऊन जातो. अश्याच थंडीत जोडीदारासोबत फिरायला जाणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षण अनुभवने आहे. तुम्हीदेखील हा अनुभव घेऊ इच्छित आहात ना. थंडीत हनिमूनसाठी आता तुम्हाला बाहेर देशात किंवा बाहेर राज्यात फिरायला जायची गरज नाही. कारण तुम्ही महाराष्ट्रातच जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. आता ही ठिकाणे नेमकी कोणती ते आपण जाणून घेऊ.
1) माथेरान :
महाराष्ट्रातील हनिमूनसाठी (Honeymoon Destinations In Maharashtra) जोडप्याच्या पसंतीस पडणारे स्थळ म्हणजे माथेरान. माथेरान हे गुलाबी थंडीत एवढे नयनरम्य दिसते की तिथे गेल्यावर तुमचा व्ही तुमच्या जोडीदाराचा पाय निघणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी माथेरान हा बेस्ट पर्याय आहे. येथे असलेले घनदाट अरण्याने तुमचे मन अधिकच पुलकित होईल. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, शर्लॉट लेक, लुईसा पॉईंट, पानोरमा पॉईंट. येथे तुम्ही नेरळहून टॉय ट्रेन पकडून जाऊ शकता. किंवा दस्तूर नाक्यापरेंत तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही ती चालवत नेऊ शकता.
2) लोणावळा : Honeymoon Destinations In Maharashtra
लोणावळा हा हनिमूनसाठी ओळखलं जाणारा सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. हनिमूनसाठी कुठे जायचे असा प्रश्न पडल्यावर सर्वात आधी लोणावळा हे नाव समोर येते. येथे असलेले निसर्ग सौंदर्य तुम्हाला एका छायाचित्रात टिपता येते. तसेच येथे असलेले धबधब्यांचे आकर्षण तुम्हाला खेचून आनु शकते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, वघाची झेप, भुशी डॅम आणि लोहगडचा किल्ला हे आहे. लोणावळा हे एक प्राचीन हिल स्टेशन असून थंडीत ह्याचे सौंदर्य तुमच्यावर मोहिनी टाकते.
3) कामशेत :
कामशेत हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी सर्वात प्रसिद्ध आहे. तुम्ही जर ह्या दिवसात एक वेगळा अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा हनिमून स्पॉट अत्यंत सुंदर असा आहे. एवढेच नव्हे तर येथे कंडेश्वर देवाचे मंदिर देखील आहे. तसेच टॉवर हिल हे देखील येथील आकर्षनाचे केंद्र आहे.
4) कोलाड :
हनिमून म्हणलं की, आपल्याला निसर्ग आणि तेथील सौंदर्य ह्या दोन गोष्टी समोर ठेऊन ठिकाण शोधले जाते. परंतु जर तुमच्या जोडीदाराला काहीतरी वेगळ करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी कोलाड हा बेस्ट पर्याय आहे. येथे तुम्ही जोडीदारासोबत एक साहसी अनुभव घेऊ शकता. रोमहर्षक व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी हे स्थळ प्रसिद्ध आहे.
5) पाचगणी :
पाचगणी हे स्थळ पाच ठेकड्यानी वेढलेले असल्यामुळे त्यास पाचगणी असे नाव देण्यात आले असावे. येथे तुम्हाला विविधतेने नाटलेल्या पाच टेकड्या पाहायला मिळतील. म्हणजे एकच ठिकाणी पाच ठिकाणचा अनुभव तुम्ही जोडीदारासोबत (Honeymoon Destinations In Maharashtra) घेऊ शकता. येथे स्ट्रॉबेरी फार्मसाह इतर अनेक गोष्टींचे आकर्षण आहे. तुम्ही येथे मुबंई किंवा पुणे रस्त्याने येऊ शकता.