औरंगाबाद | दुचाकीवरून औरंगाबादकडे निघालेल्या पती -पत्नीला समोरून आलेल्या सुसाट ट्रॅकने चाकाखाली चिरडले. अपघात एवढा भीषण होता की दोघांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. सदरची घटना आज सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय पूनमचंद छनवाल (वय-51), मीनाबाई संजय छनवाल (वय-46 दोघे रा. शांतीनगर, परसोडा, लासूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय हे सकाळी त्यांच्या (एम.एच.20 डी.एक्स.3179) या क्रमांकाच्या दुचाकीवरून औरंगाबाद शहरात कामानिमित्त येत होते. दरम्यान धुळे- सोलापूर महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे, तर बांधणी देखील अंतिम टप्प्यात आहे. याच पुलाखालून जात असताना अचानक फरशी टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. अपघातात दोघे ठार झाल्याचे कळताच ट्रक चालकाने घटनस्थळावरून पोबारा केला.
या घटनेची माहिती स्थनिकांनी पोलिसांना देताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजेश्री आडे यांनी पथकासह घटनस्थळी गाठले. अपघात एवढा भीषण होता की पती व पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते. त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते. पोलिसांना अक्षरशः मृतदेहाचा खच खोऱ्याने उचलावा लागला. तर संजय यांचे शीर पोलिसांना आढळून आले नाही.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविले असून या प्रकरणी दुपार पर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक आडे यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou