खळबळजनक! बुलडाण्यातील बाल सुधारगृहात दोन मुलांनी घेतला गळफास; घटना सीसीटीव्हीत कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा । बुलडाण्यातील एका शासकीय बालसुधारगृहात दोन बाल गुन्हेगारांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. (Suicide at Juvenile Home) शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात दोन बाल गुन्हेगारांनी बंद खोलीत गळफास घेतल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती मिळत आहे.

या मुलांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजले नाही. (Suicide at Juvenile Home) चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात एकूण ८ जण होते. पैकी मृतदेह आढळलेल्या खोलीत तीन मुले होती. एक जण सुखरूप आहे.

आत्महत्या करण्यात आलेली दोन मुले १५ दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून पळून गेली होती. त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आले होते. दोघांची आत्महत्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, दोघांनी संगनमताने आत्महत्या केल्याचे त्यातून दिसून येत आहे. आत्महत्येसाठी एकमेकांना त्यांनी मदत केल्याचे त्यात दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’