राज्यात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी ३ पक्षांनी दिलीय! देवेंद्र फडणवीसांची ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका

वाशीम । येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम इथं आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यासोबत बोलत होते. चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेतही आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. (Opportunity To Establish Power Alone In The Coming Period; Big Statement Devendra Fadnavis)

शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?
हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षापूर्वी केवळ 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत 48 जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरु शकतात, तर आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरु शकतं याचा अंदाज बांधता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like