हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्य जनतेचे घर घेण्याचे स्वप्न म्हाडा (Mhada) पूर्ण करते. म्हाडा कमी किमतीमध्ये लोकांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देते. त्यामुळे म्हाडाची घरे म्हणली की अनेकांचे कान टवकारले जातात. सध्या म्हाडाने अनेक घरांचे सोडा जाहीर केल्यामुळे 2024 मध्ये अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशा व्यक्त केली जात आहे. मात्र या सोडतीतील काही घरांच्या किमती पाहूनच लोकांना घाम फुटला आहे. या किमती थेट करोडोंच्या घरात आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांची मोठी निराशा झाली आहे.
एक कोटींच्या पुढे घरांची किंमत
सध्या म्हाडाकडून मुंबईतील गोरेगाव येथील प्रेमनगर भागात 332 उच्चभ्रू घरे उभारण्याचा प्रकल्प सुरू आहे. सुरुवातीला याच घरांच्या किमतीत बाबत लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. परंतु अखेर या घरांच्या किमती समोर आल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. कारण की, या सोडतीत मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. तर, उच्च उत्पन्न गटासाठी 979 sqft क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 40 लाख आहे.
दरम्यान, या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाची पुढील सोडत जाहीर होणार आहे. या सोडतेत कोट्यावधींच्या घरांचा ही समावेश असणार आहे. कारण की, म्हाडाच्या या घरांमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा सुविधा देण्यात येतील. म्हणजेच हे घर एका ड्रीम हाऊसप्रमाणे असेल. त्यामुळे या घरांच्या किमती एवढ्या महाग ठेवण्यात आल्या आहेत. परंतु ही घरे सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतील.