खाऊ गल्ली | धनगरी मटणाची चव ज्यांनी चाखली त्याला धनगरी मटण नेहमीच खावंसं वाटतं. धनगरी मटणाचे मसाले आणि त्याची चव आपण खातो त्या मटणापेक्षा वेगळी असती. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत धनगरी मटणाची रेसिपी.
जाणून घ्या कसे बनवतात चिकन सीस्क्टीफाय
साहित्य : बोकडाच्या पायाचे मटण अर्धा किलो, २ कांदे उभे चिरून, खोबरे, आले, लसूण, बेसन पीठ, तांबडे तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, तेल
कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा
कृती : धनगरी मटण पाया सूप बनवण्यासाठी सर्व प्रथम बोकडाच्या पायाचे मटण स्वच्छ करून घ्यावे. त्याला हळद, मीठ लावून आले लसणाची फोडणी देऊन शिजवून घ्या. मटण शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर तव्यावर उभा चिरलेला कांदा, खोबरे, आले, लसूण, बेसन पीठ २ चमचे एक एक करून भाजून घ्या. त्यानंतर या सर्व मिश्रणाची मिक्सरवर वाटून पेस्ट बनवा.
आखाड पार्टीला बनवा हैद्राबादी बिर्याणी
मटण शिजल्यावर एका कढईत फोडणीसाठी तेल घ्या. त्या तेलात मिक्सरवर वाटलेले मिश्रण घालून तेलात चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्यात १ चमचा कांदा लसूण मसाला, २ चमचे लाल तिखट, १ चमचा गरम मसाला घाला. त्यानंतर शिजलेले मटण त्यात घाला. मटण चांगले परतल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. या कालवणाला उखळी आल्यानंतर गॅसवरून कालवण खाली घ्यावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा.