कोविड पेशंट सिरियस कसा होतो? लक्षणे जाणवल्याच्या पहिल्या दिवसापासून काय कराल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अशावेळी मास्क सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टंसिंग राखणे या त्रिसूत्रीचा पालन करणे अति महत्वाचे झाले आहे. एका पाहणीत असे दिसून आले आहे की कोरोना रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवणे डॉक्टरांकरिता कठीण होते. कारण रुग्ण उपचारासाठी खूप उशिरा आलेला असतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते.कोरोना लक्षणे असल्यापासून पेशंट कसा सिरीयस होतो? याची माहिती डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जळगाव येथील रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी ही माहिती दिली आहे. जाणून घेऊया…

पहिला दिवस :
ताप आला, सर्दी झाली, अंग दुखतंय काही खास नाही असे समजून रुग्ण घरच्या घरी पॅरासिटामोल किंवा सर्दीची औषध घेतली जातात. त्यामुळे रुग्णाला थोडे बरे वाटते. अशी अवस्था पहिल्या दिवसाची असते.

दुसरा दिवस :

दुसऱ्यादिवशी रुग्णाला थोडा खोकला आहे असं जाणवू लागतं पण यावेळी रुग्ण घरच्याघरी औषधोपचार करू पाहतो. त्यामुळे ते केल्यानंतर रुग्णाला थोडं बरं वाटतं.

तिसरा, चौथा, पाचवा, सहावा दिवस :

आता तिसर्‍या दिवसापासून ताप आहे, खोकला आहे, अंगही दुखत आहे. गावातलय डॉक्‍टरांकडे हा व्यक्ती आता इलाजासाठी जातो गावातील डॉक्टरांनी सलाईन लावले तीन दिवस उपचार केले पण खूपच थकवा जाणवतो. दोन दिवस अजून ऑथोराईज्ड कोविड सेंटरकडे जाण्यासाठी वेळ घेतला जातो. आता मात्र रुग्णाला ऑक्सिजनची गरज पडायला लागते. पळापळ सुरू झाली बेड मिळेना असे होते. शेवटी कुठल्यातरी ऑथोराईज्ड कोविड सेंटरला बेड मिळतो.

नाववा दिवस : नवव्या दिवशी या रुग्णाचं सिटी स्कॅन केले जातात. ब्लड टेस्ट केल्या जातात सिटी स्कोर 25 पैकी बाराच्या वर आलाय. रक्तातील काही घटक कमी जास्त झाले आहेत. महागडी औषधे विकत घ्यावी लागतात आणि व्हेंटिलेटरचा खर्चही वाढतोय.

आता रुग्णाचा इथून पुढे सुरु होतो धोकादायक प्रवास आठ ते नऊ दिवसानंतर आपण स्वतःहून आपल्या शरीराची पूर्ण वाट लावलेली असते. या परिस्थितीत ऑक्सिजन लेवल घटतच राहिले की पेशंट सिरियस होतो. डॉक्टरच्या हातातही जास्त काही राहत नाही. पेशंटचा खर्चही खूप झालेला असतो व तरीही जीवाची काय ही गॅरंटी नसते. वाचला तरी तुमचं फुफ्फुस बऱ्याच अंशी कायमचे निकामी झालेले असते.

पहिल्या दिवशी लक्षणे दिसल्यास काय करावे

1)RTPCR टेस्ट करावी
2)टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास नाजिकच्या कोविड केअर सेंटर, DCH मध्ये ऍडमिट व्हावे.
3) आता पेशंट सहजगत्या आठ ते दहा दिवसात बरा होऊन आनंदाने घरी जाऊ शकतो.

तेव्हा नागरिकांनो आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की आपणास आनंदाने घरी जायच आहे की हॉस्पिटलमध्ये दगावायचे आहे.

Leave a Comment