नवी दिल्ली । ऑनलाइन रेस्टॉरंट डिस्कवरी आणि फूड ऑर्डरिंग फर्म Zomato लवकरच आपला IPO बाजारात आणणार आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनीने 1.2 अब्ज डॉलर्स जमा करण्याची सर्व तयारी केली आहे. भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने SEBI ने या IPO ला मान्यताही दिलेली आहे. मार्केट गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होईल. Zomato पैसे कसे कमावते. हे आपण जाणून घेउयात –
आर्थिक वर्ष 2020 दरम्यान Zomato ला 403 मिलियनहून अधिक ऑर्डर मिळाल्या आणि या ऑर्डरची किंमत 112,209 मिलियन होती. या व्यतिरिक्त, हे 2019 मध्ये 30.6 मिलियन रुपये आणि 2018 मध्ये 13,341.4 मिलियन रुपये होते. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 27,427 मिलियन रुपये होते. या फूड डिलिव्हरी व्यवसायात तीन भागधारक आहेत. यामध्ये पहिला ग्राहक, दुसरा डिलिव्हरी पार्टनर आणि तिसरा रेस्टॉरंट पार्टनर आहे.
ग्राहक (Customers)
आर्थिक वर्ष 2020 मध्ये, सरासरी 10.7 मिलियन ग्राहकांनी भारतातील Zomato वर दरमहा जेवणाची ऑर्डर दिली आहे, जे मासिक सरासरीपेक्षा तीन पटीपेक्षा जास्त आहे.
डिलिव्हरी पार्टनर (Delivery partners)
डिसेंबर 2020 पर्यंत, Zomato चे 161,637 ऍक्टिव्ह डिलिव्हरी पार्टनर होते.
रेस्टॉरंट पार्टनर (Restaurant partners)
रेस्टॉरंट्स या व्यवसायाचा कणा आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये Zomato चे दरमहा सरासरी 131,233 ऍक्टिव्ह फूड डिलिव्हरी रेस्टॉरंट्स होते.
कमाई कशी होते?
Zomato रेस्टॉरंटमधील भागीदारांकडून त्याच्या अॅपवर खाद्यपदार्थ लिस्टिंग करुन डिलिव्हरी करण्यासाठी शुल्क आकारते. डिलिव्हरी चार्ज युझर्सद्वारे दिला जातो. या व्यतिरिक्त, ग्राहकांकडून निवडलेल्या ऑर्डरवर पॅकेजिंग शुल्क देखील आकारले जाते जे रेस्टॉरंट्स पार्टनरमार्फत जाते. ग्राहकाने दिलेली टीप डिलिव्हरी पार्टनरद्वारे घेतली जाते. याव्यतिरिक्त Zomato जाहिरातींमधूनही पैसे मिळवतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा