हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र लसीचा तुटवडा संपूर्ण देशभरात झालेला पाहायला मिळत आहे. सरकारनेदेखील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली मात्र त्यांचा तुटवडा जाणवत असल्याने 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना दिली जाणारी लस राज्यात सध्या थांबवण्यात आली असून 44 वर्षांवरील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. देशात लसीचा तुटवडा जाणवत असताना मुंबईच्या आजूबाजूला मॉडर्ना कंपनीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की ‘राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातो पण देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधल्या नागरिकांना ‘मॉडर्ना’ ची लस देण्याचे काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे ? जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
नवाब मलिक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडीओ क्लिप जारी केली आहे. ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दूतावासाने कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी’ राष्ट्रीय प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. pic.twitter.com/hfJmDzmC41
— NCP (@NCPspeaks) May 13, 2021
हे लसीकरण विदेशातील दूतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना मॉडर्ना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दूतावासातील नागरिकांचे भारतीय नागरिकांना ही लसीकरण करण्यात येत आहे असा नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तीनच कंपन्यांची परवानगी असताना मॉडर्नाची लस कशी काय दिली जाते? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.