कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्याने नेहमीच राज्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. या तालुक्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दोन खंदे मुख्यमंत्री दिले आहेत. खाशाबा जाधवांसारखे ऑलंम्पिकवीर दिले आहेत. मात्र आज कराड तालुका राज्यभरात चर्चेत आहे तो वाढत्या कोरोना रुग्णांमुळे. कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आपण कराड तालुक्यातील पहिल्या रुग्णापासूनचा प्रवास जर समजावून घेतला तर कोरोना कसा फोफावला याचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. Karad Corona News
२ एप्रिल – कराड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि कराडकरांना हादरा बसला
आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी कराड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. दिनांक 2 एप्रिल रोजी तांबवे येथील ३२ वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. दूर चीन देशात जन्माला आलेला हा आजार पाहता पाहता भारतात आणि कराड तालुक्यात आल्याने पहिल्यांदा अनेकांना यामुळे हादरा बसला. मात्र जिल्हा प्रशासनाने योग्य काळजी घेत आवश्यक सर्व उपाययोजना वेळेवर अंबलबजावणी केल्याने नागरिकांना धीर आला. तसेच सदर तरुण मुंबईहून प्रवास करून आलेने त्याला बाधा झाली होती. Karad Corona News
७ एप्रिल – तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला
पहिल्या रुग्णावर उपचार सुरु होते तोच ७ एप्रिल रोजी महारुगडेवाडी येथील एका ५४ वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. मुंबईहून गावी आलेला हा पुरुष अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने प्रशासनाला घाम फुटला. मात्र महारुगडेवाडीत केवळ एकाच ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झालेली असल्याचे तपासात दिसले. यामुळे कराडकरांनी मोकळा श्वास सोडल. Karad Corona News
११ एप्रिल – तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी
कोरोना कोणाच्यातरी जीवावर बेतू शकतो हे कराडकरांनी प्रत्यक्षात अनुभवलं आणि यानंतर तालुक्यातील नागरिकांनी खऱ्या अर्थाने कोरोनाची धाय खाल्ली. कोरोनाने कराड शहर नाही तर थेट ग्रामीण भागावरच हल्ला चढवला होता. ११ एप्रिल रोजी महारुगडेवाडी येथे सापडलेल्या ५४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१५ एप्रिल – संपर्कातून कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला
आत्तापर्यंत सापडलेले दोन्ही रुग्ण हे बाहेरुन प्रवास करुन आले होते. त्यांना ट्रेव्हल हिस्टरी होती. मात्र १५ एप्रिल रोजी तालुक्यात निकटवर्तीयाच्या संपर्कातून कोरोनाची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला. महारुंगडेवाडी येथील एका ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच याच दिवशी ओगलेवाडी येथे आणखी एक रुग्ण सापडला. यामुळे आता तालुक्यातील नागरिकाची चिंता वाढली. Karad Corona News
१८ एप्रिल – तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला
तांबवे येथील ३२ वर्षीय तरुणावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊन १८ एप्रिल रोजी या तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला. तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बनले.
१९ एप्रिल – चरेगाव येथे ३२ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर बाबरमाचीतील ३६ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. Karad Corona News
२२ एप्रिल – वनवसमाची येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला
वनवासमाची येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या तरुणाने नागपूरला प्रवास केल्याने त्याला बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या युवकाच्या निकटवर्तीयांनी कोरोना चाचणी घेतली गेली. आणि येथून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एक मोठी साखळी सुरु झाली
यानंतर ३० एप्रिल पर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत खालीलप्रमाणे लक्षणीय वाढ झाली. Karad Corona News
२२ एप्रिल : आगाशिवनगरच्या युवकालाही कोरोनाची लागण
२३ एप्रिल : आगाशिवनगरमधील दोन युवकांना कोरोनााची बाधा
२३ एप्रिल : वनवासमाचीतील ५४ वर्षीय महिलाही पॉझिटीव्ह
२५ एप्रिल : वनवासमाचीतील कोरोना रूग्णाचे निकट सहवासीत चारजण पॉझिटीव्ह, आगाशिवनगरमधील एकजण पॉझिटीव्ह, मलकापुरमधील दोघे पॉझिटीव्ह, रेठरे, कापिल, येतगाव, कासेगाव, कामेरीतील प्रत्येकी एक असे एकाच दिवशी बाराजण पॉझिटीव्ह
२७ एप्रिल : दोन महिला कोरोनाबाधीत. त्यामध्ये आगाशिवनगर येथील चार दिवसांची बाळंतीण व वनवासमाचीतील एका महिलेचा समावेश.
२८ एप्रिल : मलकापुरातील दोघे तर वनवासमाचीतील तिघे असे एकुण पाच पॉझिटीव्ह
३० एप्रिल : वनवासमाचीतील दहा वर्षीय मुलगा कोरोनाबाधीत
१ मे – एका दिवसात तब्बल २४ रुग्ण सापडले
यंदाचा महाराष्ट्र दिन कराडवासीयांसाठी चिंता वाढवणारा ठरला. या एका दिवसात तालुक्यात तब्बल २४ रूग्ण पॉझिटीव्ह सापडले. धक्कादायक बाब म्हणजे कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालायातील ६ कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्याने तालुका हादरला. बाळंतपणासाठी आलेल्या कोरोनाबाधित गरोदर महिलेमुळे या ६ जणांना आणि एका निकटवर्तीयाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर दुपारी २ जण कोरोना बाधित सापडले. त्यानंतर पुन्हा रात्री उशिराने आणखी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. या सर्व घटनांमुळे संपूर्ण कराड तालुकाच हादरून गेला. १ मी रोजी सापडलेल्या रुग्णामध्ये वनवासमाची १४, मलकापूर २, कºहाड ५, उंब्रज १, सातारा १, आगाशिवनगर १ आहेत.
२ मे – कराड तालुक्यात दिवसभरात एक रुग्ण सापडला. आत्तापर्यंत कराड तालुक्यात एकूण ५७ कोरोनाबाधित सापडले आहेत. तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. Karad Corona News
४ मे – वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित
६ मे – वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 10 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे.
कराड शहरात व तालुक्यात कोरोनाचे अतिसंवेदनशिल भाग पुढीलप्रमाणे
– मलकापुर आगाशिवनगर नगरपालिका हदद
– कराड वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसर
– वनवासमाची
– हजारमाची
– बाबरमाची
– कापील
– रेठरे बुद्रूक
– महारुगडे वाडी
– ओगलेवाडी
वरील गावासह कराड शहराच्या तीन किलोमिटर अंतरातील ११ गावे कंटेनमेंट झोन म्हणून जाहिर केली असुन येथे निर्बंध आहेत प्रशासनाने येथे कडक उपाययोजना केल्या आहेत Karad Corona News
कराड तालुक्यात आजपर्यंत कोरोना रुग्ण सापडलेली गाव, व संख्या
तांबवे 1
महारुगडेवाडी 2
ओगलेवाडी 1
चरेगाव 1
बाबरमाची 1
कापिल 2
आगाशिवनगर मलकापुर नगरपालिका 15
वनवासमाची 26
कराड शहर 6
उंब्रज 1
डेरवण 1 पाटण तालुका
एकुण. 70
सातारा जिल्हा प्रशासन अतिशय सुव्यवस्थित पणे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील परिस्थिती हाताळत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत आहोत. जरी मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असली तर बहुतेक रुग्ण हे कंटेनमेंट झोनमधील आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र सद्य परिस्थितीमध्ये सर्वांनी अतिशय खबरदारी घेऊन वागणे गरजेचे आहे. तसेच कराड तालुक्यात डॉक्टर आणि दवाखान्यांची पुरेपूर उपलब्धता आहे. कृष्णा हॉस्पिटल सारखे भव्य रुग्णायल कराड मध्ये असताना नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. जिल्ह्यातील प्रशासन कोरोनावर मात करायला खंबीर असून आपण त्यांना पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. Karad Corona News