यंदा शाळांना दिवाळीच्या फक्त 14 सुट्ट्या मिळणार; वर्षातील अजून किती सुट्ट्या शिल्लक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सध्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सगळ्या शाळांमध्ये चालू आहे. ही परीक्षा जवळपास 27 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. आणि 28 ऑक्टोबर नंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. या सुट्ट्या त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत. पण 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा या 11 नोव्हेंबर पासून सुरू होईल. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीत फक्त 23 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनानुसार 27 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या सत्राची परीक्षा पूर्ण करण्याची आदेश दिले होते. त्यामुळे सध्या अनेक शाळांमध्ये परीक्षा देखील सुरू आहे. काही शाळांच्या परीक्षा या पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक सराव या सगळ्या परीक्षा 27 ऑक्टोबर पर्यंत संपणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदार होणार असल्याने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांना मतदानाचे महत्त्व देखील पटवून देण्यास सांगितलेले आहे.

दहावी आणि बोर्ड बारावीची बोर्डाची परीक्षा

दिवाळी संपली की दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला विद्यार्थी लागत असतात. या वर्षी बारावीच्या बोर्डाची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान चालणार आहे. तर 24 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होईल तसेच दहावीच्या बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तर 27 मार्च रोजी संपणार आहे तसेच तीन ते 20 फेब्रुवारी दरम्यान त्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे.

या वर्षातील उर्वरित सुट्ट्या

यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर असणार आहेत. तसेच 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे. 25 डिसेंबर रोजी की ख्रिसमस आहे 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री, 14 मार्च धुलीवंदन, 19 मार्च जी रंगपंचमी, 30 मार्च रोजी गुढीपाडवा, 6 एप्रिल रोजी रामनवमी, 10 एप्रिल रोजी महावीर जयंती, 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 18 एप्रिल गुड फ्रायडे, 1 मे महाराष्ट्र दिन, 2 मे ते 14 जून उन्हाळ्याच्या सुट्ट्या एवढ्या सुट्ट्या इथून पुढे शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.