या फोटोत दिसतायत चार हत्ती मात्र, प्रत्यक्षात आहेत त्याहून जास्त; शोधा पाहू…

0
160
Elephants Optical illusion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये बुद्धीला अधिक जोर लावणारे शब्दाचे कोडे, चित्रांचे कोडे व्हायरल होत आहे. अशा प्रकाच्या कोंड्याचे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये दडलेले रहस्य शोधण्यात अनेकांच्या बुद्धीचा कस लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने अनेकांच्या बुद्धीला जोर लावण्यास भाग पाडले आहे. कारण, व्हायरल झालेल्या या फोटोत हत्तींचा कळप नदी किनाऱ्यावर उभा असलेला दिसत आहे. सहज पाहिले तर या कळपात चार हत्ती दिसत आहेत. पण त्याहून अधिक हत्ती आहेत.

या हत्तीच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोतील हत्तीची संख्या सांगण्यात जवळपास 99 टक्के लोकांचे उत्तर चुकले आहे. तुम्ही जर त्या 99 टक्के लोकांमध्ये नसाल आणि स्वतःला बुद्धिमान समजत असाल, तुमच्याकडे हत्तींना पाहण्याची तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही शोधून दाखवू शकता. फक्त 5 सेकंदांच्या वेळेत फोटोतील हत्तींची संख्या शोधून दाखवायची आहे. वेळेत तुम्ही बरोबर उत्तर दिले तर नक्कीच तुम्ही बुद्धिमान आहात हे सिद्ध होईल.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या हत्तींच्या कळपाच्या फोटोत काही हत्ती पाणी पिण्यासाठी तलावाच्या किनाऱ्यावर उभे असलेले दिसत आहेत. तुम्हाला फक्त एव्हढच सांगायचं आहे की, या फोटोत तुम्हाला किती हत्ती दिसत आहेत? बुद्धीला चक्रावून टाकणाऱ्या या फोटोत चार हत्ती दिसत आहेत. पण ज्यांनी चार हत्तींना पाहिले आहे, त्यांचे उत्तर चुकले आहे. हत्तींची बरोबर संख्या पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या या मजेदार फोटोने अनेकांना थेट हत्तींची एकूण संख्या सांगण्याचे आव्हानंच एकप्रकारे दिले आहे.

फोटोत आहेत ‘इतके’ हत्ती

या फोटोत किती हत्ती आहेत? हे तुम्हाला अजूनही कळले नसेल, तर तुम्हाला आम्ही या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. तुम्हाला जरी विश्वास बसला नाही, तरी काही हरकत नाही. पण या फोटोत सात हत्ती आहेत. ज्यांना पाहण्यासाठी तुम्हाला गरुडासारखी नजर ठेवावी लागेल. आता शोधून दाखवा फोटोतील सात हत्ती.