LIC पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती आणि कसा फायदा मिळेल?; चला जाणून घ्या

LIC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LIC चा मेगा IPO मार्चपर्यंत येऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या बहुप्रतिक्षित IPO साठी गुंतवणूकदारही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदार जे पॉलिसीधारक आहेत ते या IPO मध्ये जास्त रस दाखवत आहेत. याचे मोठे कारण म्हणजे त्यांना IPO साठी मिळणारा वेगळा कोटा.

सरकारने पॉलिसीधारकांसाठी IPO मध्ये 10 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. म्हणजे LIC पॉलिसीधारकांना IPO मध्ये 10 टक्के वेगळा कोटा मिळेल. म्हणजेच त्यांना शेअर्स मिळण्याची शक्यता जास्त असेल. मात्र आता त्यांना या वेगळ्या कोट्याचा लाभ कसा मिळणार हा प्रश्न आहे. डिमॅट खाते असलेले अनेक पॉलिसीधारक हा प्रश्न विचारत आहेत की, आम्हाला शेअर्स मिळवण्यासाठी काय करावे लागेल. पॉलिसीधारकांना काय करावे लागेल ते येथे सविस्तरपणे समजून घेऊ.

पॅन लिंक करणे आवश्यक आहे
जर पॉलिसीधारकांना IPO साठी अर्ज करायचा असेल, तर LIC च्या वेबसाइटनुसार, त्यांना पहिले LIC च्या साइटवर त्यांचा पॅन अपडेट करावा लागेल. LIC ने आपल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, “IPO मध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.

तसेच, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. तुम्‍हाला LIC च्‍या रेकॉर्डमध्‍ये तुमचा पॅन अचूक एंटर करायचा असेल, तर ‘या’ स्टेप फॉलो करा –

1. सर्व प्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा.

2. येथे तुम्हाला ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन मिळेल. तो सिलेक्ट करा.

3 ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचे पेज उघडताच, असे लिहिले जाईल – पुढे जा. त्यावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन पेज वरील ‘प्रोसीड’ बटण सिलेक्ट करा.

4. तुमचा ईमेल ऍड्रेस, पॅन, मोबाइल नंबर आणि LIC पॉलिसी क्रमांक एंटर करा.

5. बॉक्समध्ये कॅप्चा कोड एंटर करा.

6. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून OTP पाठवण्याची रिक्वेस्ट करा.

7. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP मिळताच, तो सबमिट करा.

8. सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा ​​मेसेज येईल.

पॅन अपडेट झाला आहे की नाही ते अशाप्रकारे तपासा

तुमचा पॅन LIC च्या रेकॉर्डमध्ये अपडेट झाला आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. यासाठी ‘या’ स्टेप्स आहेत –

1. https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जा.

2. पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि पॅन डिटेल्स आणि कॅप्चा एंटर करा. नंतर सबमिट वर क्लिक करा

3. तुमची माहिती उघड होईल.