शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवारांची संपत्ती किती? ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राज्यसभेसाठी छ. संभाजीराजे यांनी शिवसेनेसोबत न जुळविल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारी दिले त्या संजय पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये त्यांनी 18 कोटी रूपयांची शेतजमीन असल्याचे म्हटले आहे.

संजय पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 लाख 19 हजार रुपयांची जंगम तर 39 लाख 99 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तर पत्नीकडे 47 लाख 29 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार संजय पवार यांच्या मालमत्तेची किंमत 2 कोटी 72 लाख आहे. त्यांच्याकडे 18 कोटी रुपयांची कोल्हापूर येथे शेतजमीन आहे.

संजय पवार यांच्यावर 47 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 12 लाख रुपयांचे दागिने, तर पत्नीकडे 33 लाख रुपयांचे दागिने आहेत. पवार यांनी नागाळा पार्क येथे कमर्शिअल जागा 35 लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्याची सध्याची बाजारभाव किंमत 2 कोटी 44 लाख आहे. त्यांच्या बँक खात्यात 6 लाख 71 हजार रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment