तुळजापूर-लातूर महामार्गावर शिवशाही बस व ट्रकचा भीषण अपघात, 6 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुळजापूर : हॅलो महाराष्ट्र – तुळजापूर-लातूर महामार्गावर शनिवारी ट्रक आणि शिवशाही बस यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तुळजापूर-लातुर रस्त्यावर बायपासजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या व्यक्तींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एसटी आणि ट्रक दोन्हीही बायपासजवळ एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे
शौनकबी नसीर पटेल (वय 65, राहणार केशेगांव ता.तुळजापूर), शोभा यशवंत कानडे (वय 60, राहणार तुळजापूर), हमनाराम निरानाम (वय 35, रा. राजस्थान), महुद्दीन सरदार शेख (वय 29, रा. चडचण, कर्नाटक), एसटी चालक किरण रंगनाथ गुंडले ( वय 31, रा. दवेली, ता.रेणापूर), सोपान विठ्ठल भागवत (43, रा.लातूर) अशी या अपघातात (Accident) जखमी झालेल्यांची नावे आहेत.

दिवसभरात त्याच ठिकाणी तीन अपघात
तुळजापूर-लातुर रस्त्यावर शनिवारी याच ठिकाणी दुचाकीचा अपघात (Accident) झाला. तसेच दुपारी बारा वाजता कार-ट्रक अपघातात याच ठिकाणी दोन जण जखमी झाले होते. यानंतर सायंकाळी सहा वाजता सहा जण ट्रक आणि शिवशाही बस यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

Leave a Comment